Jaya Prada : बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सातव्यांदा अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचं हे प्रकरण आहे. त्यांच्याविरोधात स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेकदा आदेश देऊनही जया प्रदा न्यायालयात उपस्थित राहिलेल्या नाहीत. आता या प्रकरणाची 25 जानेवारी 2024 रोजी सुनावनी होणार आहे. रामपुरातील MP MLA न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
जया प्रदा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रामपूरात भाजपने उमेदवारी दिली होती. पण या निवडणुरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये जयाप्रदा रामूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
स्वार पोलीस ठाण्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जया प्रदा यांनी आचार संहितेचं उल्लंघन केलं आहे. त्यावेळी आचार संहिता लागू असताना त्यांनी एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. तसेच केमरी भागातील एका गावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावनी एमपी-एमएलए स्पेशल न्यायालयात सुरू आहे. अभिनेत्रीवर सातव्यांदा अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे.
कोण आहेत जया प्रदा? (Who is Jaya Prada)
जया प्रदा अभिनेत्री असण्यासह राजकारणातदेखील सक्रीय आहेत. कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 2004 ते 2014 या काळात त्या उत्तर प्रदेशातील राजपूर येथील खासदार होत्या. मवाली, तोहफा, आखिरी रास्ता, औलाद, घर-घर की कहानी, मैं तेरा दुश्मन, ऐलान-ए-जंग, जादुगर आणि आज का अर्जुन, अशा अनेक सिनमांचा त्या भाग आहेत. भारतीय मनोरंजनसृष्टीतील महान अभिनेत्रींपैकी जया प्रदा एक आहेत.
जया प्रदा यांचा राजकीय प्रवास
जया प्रदा यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1994 मध्ये 'तेलुगू देसम' या पक्षातून केली आहे. आंध्र प्रदेशमधून 1996 मध्ये त्या पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या. त्यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
संबंधित बातम्या