Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा छोट्या पडड्यावरील लोकप्रिय टॉक शो आहे. नुकताच हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्या भागात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहने (Ranveer Singh) हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणे दिपवीरचा भाग चांगलाच गाजला. आता 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात कोण हजेरी लावणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


करण जोहरने दिली हिंट


'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम करण जोहर (Karan Johar) होस्ट करत आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची हिंट करण जोहरने दिली आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये सेलिब्रिटी सिब्लिंग्स जोडी सहभागी होणार आहे. त्यामुळे 'कॉफी विथ करण 8'मध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चाहते चर्चा करताना दिसत आहेत. रानी मुखर्जी आणि काजोल, जान्हवी कपूर आणि खुशी, सारा अली खान आणि इब्राहिम अशा अनेक नावांचा यात समावेश आहे.






मीडिया रिपोर्टनुसार,'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणारी जोडी सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांची आहे. सनी आणि बॉबी देओल पहिल्यांदाच 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असं नाही. याआधीदेखील 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागातील तेराव्या एपिसोडमध्ये ते सहभागी झाले होते. 


सनी देओल आणि बॉबी देओल दोघेही मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. सनी गेल्या काही दिवसांपासून 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे बॉबी देओलच्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाची सध्या चर्चा आहे. 


'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचं शूटिंग सनी आणि बॉबी देओल यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण केलं आहे. या एपिसोडमध्ये त्यांनी नातं, कुटुंब आणि फिल्मी करिअरवर भाष्य केलं आहे. दोन्ही भावांनी केमिस्ट्री जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण' मधील दीपिकाच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा; नेटकऱ्यांना रणवीरवर आली दया, म्हणाले, "त्याच्या डोळ्यात वेदना दिसतायत"