Koffee With Karan 8:  कॉफी विथ करण-8 (Koffee With Karan 8) या कार्यक्रमाचा नवा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या एपिसोडमध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना दिसत आहेत.  कॉफी विथ करण-8  या शोमध्ये करण जोहरनं रॅपिड फायर राऊंडमध्ये सारा आणि अनन्याला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना सारा आणि अनन्यानं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.


कॉफी विथ करण-8  या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहरनं अनन्याला प्रश्न विचारला की, 'सारानं कोणत्या सेलिब्रिटीला डेट करावं?' करणनं विचारलेल्या या प्रश्नाला अनन्यानं उत्तर दिलं, कोणीच राहिलं नाही, मला वाटते की आता तिनं इतर देशांमध्ये किंवा खंडामध्ये जावे. अनन्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर करण आणि सारा  जोरजोरात हसायला लागले.


साराने शोमध्ये सांगितले होते की, तिला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवा आहे. करणने साराला प्रश्न  विचारला की,- अभिनेता, क्रिकेटर आणि बिझनेसमनमध्ये कोण चांगला बॉयफ्रेंड होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर देत सारा म्हणाली की, "तिला एक आदर्श जोडीदार हवा आहे, जो अभिनेत्यासारखा दिसला पाहिजे, जो क्रिकेटरसारखा स्ट्राँग असला पाहिजे आणि त्याच्याकडे व्यावसायिकासारखा पैसा असावा."






कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये सारा अली खाननं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगबाबत देखील सांगितलं आहे.  कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये सारा ही अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटिंगबाबत देखील बोलताना दिसत आहे. कॉफी विथ करणमध्ये करण जोहर हा साराला विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे जी अनन्याकडे आहे पण तुझ्याकडे नाहीये. या प्रश्नाचं उत्तर देत सारा म्हणते, 'द नाइट मॅनेजर.' 


सनी देओल आणि बॉबी देओल, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी कॉफी विथ करण-8  या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. तसेच करीना कपूर, आलिया भट्ट, काजोल हे कलाकार देखील लवकरच या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.


संबंधित बातम्या:


Koffee With Karan 8 : कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान; म्हणाली,"Permanent काही नसतं"