Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) स्टारर 'इमर्जन्सी' (Emergency) या आगामी चित्रपटाचा टीझर 14 जुलै रोजी रिलीज झाला. कंगनाचा हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. या टीझरने चाहत्यांवर जादू केली आहे. चित्रपटाचा हा टीझर रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंग आहे. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीवर आधारित आहे. कंगनाच्या ‘इंदिरा गांधीं’ लूकने याआधीच खूप वाहवा मिळवली आहे. तिच्या या भूमिकेसाठी सेलिब्रिटींपासून चाहत्यांनी सर्वांनी तिचे कौतुक केले. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील टीझर शेअर करत तिचे कौतुक केले आहे.


अभिनेता अनुपम खेर यांनी नुकताच या चित्रपटाचा टीझर ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिले की, ‘प्रिय कंगना रनौत! #Emergency चा किती उत्कृष्ट टीझर! तू खरोखर हुशार आहेस! माझे आजोबा म्हणायचे, वाहणारे पाणी कोणीच रोखू शकत नाही. जय हो!’


पाहा पोस्ट :



कंगनाने शेअर केला व्हिडीओ


‘Emergency’  चित्रपटाचा टीझर कंगनानं सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Presenting ‘Her’who was called ‘Sir’ इमरजंसीच्या शूटिंगला सुरुवात' टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी. सी 1971 असं लिहिलेलं दिसत आहे. इमरजंसी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे. कंगनाच्या चाहत्यांनी या टीझरवर कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.


कंगनाने आधीही साकारल्या सशक्त भूमिका!


याआधीही कंगना पडद्यावर अनेक शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकेत दिसली होती. ‘थालयवी’मध्ये कंगनाने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका साकारली होती आणि ‘मणिकर्णिका’मध्ये तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली होती. 2023 मध्ये तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कंगनाचा शेवटचा चित्रपट 'धाकड' हा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. त्यामुळे तिच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.


हेही वाचा: