कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं उदाहरण केरळच्या कोची शहरात पाहायला मिळालं. चहूबाजूंनी चाहत्यांच्या गराड्यात अडकलेल्या सनीच्या कारचा हा फोटो पाहून तिच्या क्रेझचा अंदाज येईलच.

केरळमध्ये विमानतळावरुन कोचीच्या एमजी रोडवर पोहोचताच चाहत्यांनी तिची कार चहूबाजूंनी घेरली. हा नजारा सनीचा पती डॅनियल वेबरने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे. यानंतर सनीनेही हा फोटो स्वत:च्या अकाऊंटवरुन शेअर केला.

https://twitter.com/SunnyLeone/status/898110975722872833

चाहत्यांचं प्रेम पाहून सनीला चेहऱ्यावरील आनंद लपवता येत नव्हता. "कोचीमध्ये माझी कार जणू प्रेमाच्या समुद्रात उभी आहे," असं कॅप्शन सनीने फोटो शेअर करताना लिहिलं आहे.

सनी लियोनी एका प्रीमियर स्मार्टफोन आऊटलेटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कोचीमध्ये आली होती.

एमजी रोडवर आयोजित या सोहळ्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहून सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरने असे फोटो पोस्ट केले, ज्यात सनीच्या चाहत्यांच्या गर्दीची तुलना बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी झालेल्या गर्दीशी केली.

https://twitter.com/DanielWeber99/status/898141139043332097

सनीची एक झलक मिळवण्यासाठी चाहत्यांची कसरत सुरु होती. फॅन्स सनी...सनी...च्या घोषणा देत होते. इतकंच नाही तर पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं.

स्वत:साठी आलेला जनसागर पाहून सनीनेही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. "निशब्द....कोचीमधील चाहत्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. लोकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. देवभूमी केरळला मी कधीच विसरु शकणार नाही. पुन्हा आभार," असं सनीने लिहिलं आहे.

https://twitter.com/SunnyLeone/status/898088217370664961