'सुलतान' पाहिल्यावर लूलियाचा सलमानवर कौतुकाचा वर्षाव!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 03:39 PM (IST)
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं जरी गर्लफ्रेंड लूलियासोबतच्या नात्याबाबत अद्यापही चुप्पी साधली असली तरीही लूलिया मात्र आपलं प्रेम व्यक्त करताना अजिबात मागे हटत नाहीए. सुलतानच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी सलमानसोबत लूलिया दिसून आली. त्याचवेळी तिनं सलमानच्या अॅक्शनचं सोशल मीडियावर तोंड भरुन कौतुक केलं. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये सुलतानचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. सिनेमा पाहिल्यानंतर लूलिया फारच खुशीत दिसून आली. आपला हाच आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. लुलियानं सुलतानला पाच स्टार रेटिंग देऊन #fightforlove म्हणत सलमानचं कौतुक केलं आहे. या पोस्ट सोबतच लुलियानं सुलतानच्या प्रमोशनसाठी एक खास आठवणही शेअर केली. या आठवणीसाठी तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक छोटी मुलगी पिझ्झा हातात घेऊन उभी आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लुलियानं लिहलं आहे की, या मुलीनं पिझ्झाची टॉपिंग सोडून त्याचा फक्त बेसच खाल्ला. कार 'बेबी को बेस पसंद है'. खरं तर हे गाणं सुलतान सिनेमातील असून सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच या गाण्याला बरीच पसंती मिळाली आहे.