Neena Kulkarni: मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. नीना कुळकर्णी यांनी 1980 मध्ये  अभिनेते दिलीप कुळकर्णी  यांच्यासोबत लग्न केले. दिलीप आणि नीना कुळकर्णी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात...


नीना कुळकर्णी यांनी सुलेखा तळवलकर यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, 'दिलीप हा दुबे यांच्या ग्रुपमध्ये मला भेटला. तिकडे तो एकलकोंडा असायचा. तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडले होते. मी त्यानं दिग्दर्शित केलेलं एक नाटक पाहिलं होतं. ते नाटक पाहून मी खूप इम्प्रेस झाले होते. जेव्हा मी ते नाटक पाहिलं तेव्हा माझ्या बाजूला जे लोक होते त्यांना मी म्हणाले की, हे नाटक ज्यानं दिग्दर्शित केलं आहे, त्याच्या मी प्रेमात पडले आहे. ते नाटक दिलीप कुळकर्णीनं दिग्दर्शित केलं होतं. पण तेव्हा त्याच्याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. जेव्हा आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो तेव्हा मला तो आवडायला लागला.'


पुढे  नीना कुळकर्णी यांनी सांगितलं,'मी त्याचं नाटक बघायला जायचे. नाटकाच्या दरम्यान तो प्रेक्षकांसोबत बोलायचा. तो तेव्हा प्रेक्षकांना सांगायचा की, माझं आडनाव 'कुळकर्णी' आहे. ते माझ्या लक्षात राहिलं. जेव्हा मी मराठीत जास्त काम करायला लागले तेव्हा माझं अडनाव हे कुळकर्णी असंच असावं याकडे मी लक्ष द्यायला लागले. मी अनेक वेळा ट्वीट करते की, माझं नाव कुळकर्णी आहे.'






परिंदा (1989), विनाशक  (1998) आणि सर्वसाक्षी (1978) थोडासा रूमानी हो जाए, मेरे बीवी की शादी या हिंदी चित्रपटांमध्ये दिलीप कुळकर्णी यांनी काम केलं. चौकट राजा ,आई, विनायक  या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 2002 मध्ये दिलीप यांचे निधन झाले.


नीना कुळकर्णी यांच्या मालिका आणि चित्रपट


नीना कुळकर्णी यांनी थोड़ा है थोड़े की जरूरत है,  ये हैं मोहब्बते या हिंदी मालिकांमध्ये काम केलं.  ध्यानीमनी, हमिदाबाईची कोठी, छापा-काटा, वाडा चिरेबंदी या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  सातच्या आत घरात,आधारस्तंभ,सवत माझी लाडकी, उत्तरायण या मराठी चित्रपटांमध्ये नीना कुळकर्णी यांनी काम केलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ashwini Bhave: कधी 'बनवाबनवी'मधील मॅडम तर कधी 'राऊ' मधील मस्तानी होऊन जिंकली प्रेक्षकांची मनं; लग्नानंतर परदेशात झाली सेटल, जाणून घ्या अश्विनी भावेची लव्ह स्टोरी...