Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काल (21 एप्रिल)प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी काही मजेशीर मिम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका नेटकऱ्यानं शेअर केलेल्या एका मीममध्ये 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या शोदरम्यान संपूर्ण थिएटर रिकामे असलेले दिसत आहे. या मीमला त्या नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं, 'संपूर्ण थिएटर रिकामे आहे. हा चित्रपट खूप खराब आहे. हा चित्रपट बघू नका, पैसे वाचवा.'
पाहा मिम्स:
'किसी का भाई किसी की जान' ची स्टार कास्ट
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सलमानचे आगामी चित्रपट
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :