Kiran Mane : अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढल्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. काही मंडळी किरण माने यांना पाठिंबा दर्शवत आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. 'मुलगी झाली हो' मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींनी किरण मानेंवर गंभीर आरोप केले होते. अशातच किरण माने यांच्या पत्नी ललीता किरण माने यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. 


किरण माने गेली अनेक वर्ष मालिकांमध्ये काम करत आहेत. व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. तक्रार अर्जात किरण मानेंच्या पत्नीने लिहिले आहे, किरण माने पुरोगामी विचारवंत आणि लेखक आहेत. ते विविध माध्यमातून त्यांची वैचारिक भूमिका मांडत असतात. त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकले आहे. निर्मांत्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. तसेच कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याने मानसिक तणावात आहे. 


कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत.


राजकीय पोस्ट केल्या प्रकरणी आपल्याला स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकले असल्याचा आरोप किरण माने यांनी  केला होता. दरम्यान  याच मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींनी किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. किरण मानेंवर गंभीर आरोप करत मालिकेतील महिला कलाकार म्हणाल्या,"माने हे सतत टोमणे मारायचे. किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता". मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही कधीही काढून टाकेन, अशी भाषा त्यांनी वापरल्याचाही दावा किरण माने यांच्या सहकलाकारांनी केला आहे.


संबंधित बातम्या


Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित


Birju Maharaj : एका युगाचा अंत; पंडित बिरजू महाराजांना दिग्दर्शक अनिल शर्मांची श्रद्धांजली


'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha