Animal Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षित 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. रणबीर हा 2023 या वर्षाचा शेवट धमाकेदार पद्धतीनं करणार आहे. अॅनिमल चित्रपटाचे एक खास पोस्टर शेअर करुन चित्रपटाच्या मेकर्सनं या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये रणबीर हा किलर लूकमध्ये दिसत आहे.


अॅनिमल चित्रपट कधी होणार रिलीज?


अॅनिमल चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी,  तेलुगु, तमिळ,  कन्नड आणि  मल्याळम या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी अॅनिमल चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "तो मोहक आहे. तो जंगली आहे.  त्याचा राग तुम्हाला 28 सप्टेंबरला बघायला मिळेल"  28 सप्टेंबरला म्हणजेच रणबीर कपूरच्या वाढदिवसाला अॅनिमल चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे. आता रणबीर कपूरचे चाहते त्याच्या अॅनिमल चित्रपटाच्या टीझरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






'अॅनिमल' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता. पण नंतर  चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. काही दिवसांपूर्वी 'अॅनिमल' चित्रपटाचा  प्री-टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.  या प्री-टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रणबीर कपूरचा अॅनिमल हा  चित्रपट टी-सीरीज, मुराद खेतानी, सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी यांच्या प्रॉडक्शन हाऊस भद्रकाली पिक्चर्स यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.


 मार्च महिन्यामध्ये रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट रिलीज झाला. .या चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि रणबीरच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता 'तू झूठी मैं मक्कार'  चित्रपटाप्रमाणेच 'अॅनिमल'  या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


Animal Pre Teaser Out : हातात हातोडा, तोंडात सिगारेट; रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'चा प्री-टीझर आऊट