Animal Pre Release Event: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हे सध्या त्यांच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी अॅनिमल चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचली, जिथे चाहत्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या प्रमोशन इव्हेंटमध्ये तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी (Malla Reddy) यांनी देखील हजेरी लावली. यावेळी मल्ला रेड्डी यांनी बॉलिवूड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


काय म्हणाले मल्ला रेड्डी? (Malla Reddy Statement)


अॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मल्ला रेड्डी हे स्टेजवर बोलताना दिसत आहेत आणि रणबीर कपूर, एस.एस. राजामौली, महेश बाबू आणि संदीप रेड्डी वंगा हे त्यांचे भाषण ऐकताना दिसत आहेत. मल्ला रेड्डी रणबीरला म्हणतात, "रणबीर जी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. येत्या पाच वर्षात आपले तेलुगू लोक संपूर्ण भारतावर, बॉलिवूडवर, हॉलिवूडवर राज्य करतील. तुम्हालाही एक वर्षानंतर हैदराबादला शिफ्ट व्हावे लागेल.कारण मुंबई आता जुनी झाली. आता भारतात एकच शहर आहे आणि ते म्हणजे हैदराबाद. तेलुगू लोक स्मार्ट आहेत. जसे की, राजामौली, संदीप रेड्डी" व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मल्ला रेड्डी यांचे बोलणे ऐकल्यानंतर रणबीर हसताना दिसत आहे. सध्या मल्ला रेड्डी यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.


पाहा व्हिडीओ:






अॅनिमल कधी होणार रिलीज? (Animal Aelease Date) 


रणबीरचा  'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांनी देखील काम केलं आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Animal Song Arjan Vailly Out: रक्ताने माखलेला रणबीर अन् जबरदस्त अॅक्शन सीन्स; 'अॅनिमल' मधील 'अर्जन वेली' गाणं रिलीज