OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील 'कार्तिकेय 2', 'रक्षा बंधन', 'मजा मा'सारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कार्तिकेय 2 : कधी होणार प्रदर्शित? 5 ऑक्टोबरकुठे होणार प्रदर्शित? झी 5
'कार्तिकेय 2' हा बहुचर्चित दाक्षिणात्य सिनेमा आता झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने अनेक हिंदी सिनेमांना मागे टाकलं होतं. आता हा सिनेमा 5 ऑक्टोबरपासून प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकता. ओटीटीवर हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
रक्षा बंधनकधी होणार प्रदर्शित? 5 ऑक्टोबरकुठे होणार प्रदर्शित? झी 5
खिलाडी कुमारचा 'रक्षा बंधन' हा सिनेमा सिनेमागृहात जादू दाखवण्यात कमी पडला होता. 'रक्षा बंधन'च्या दिवशी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण त्यावेळी 'लाल सिंह चड्ढा'ला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. आता 5 ऑक्टोबरला हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
मजा माकधी होणार प्रदर्शित? 6 ऑक्टोबरकुठे होणार प्रदर्शित? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
'मजा मा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. माधुरीचा हा ओटीटीवर प्रदर्शित होणारा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात गजराज राव, रजित कपूर, बरखा सिंह, ऋत्विक भौमिक, सिमोन सिंह, श्रीवास्तव, निनाद कामत आणि शीबा चड्ढा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
एक्सपोज्डकधी होणार प्रदर्शित? 6 ऑक्टोबरकुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
'एक्सपोज्ड' ही दाक्षिणात्य वेबसीरिज आहे. 6 ऑक्टोबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात.
प्रेकधी होणार प्रदर्शित? 7 ऑक्टोबरकुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
'प्रे' या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा सिनेमा इंग्रजीसह हिंदी भाषेतदेखील पाहू शकतात. 'प्रे' हा प्रिडेटर या सिनेमाचा सीक्वल आहे. हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या