Khichdi 2 Trailer: नोव्हेंबर महिना सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजक असणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. या यादीत कॉमेडी चित्रपट 'खिचडी 2' (Khichdi 2) चित्रपटाचा देखील समाविष्ट आहे. हा चित्रपट 17 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.


खिचडी-2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे, जो पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रंजक दिसत आहे. या ट्रेलरमध्ये   पारेख कुटुंब दिसत आहे. ट्रेलरमध्ये हंसा आणि प्रफुलची जोडी पुन्हा धुमाकूळ घालताना दिसत आहे. 2:34 मिनिटांच्या या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, यावेळी पारेख कुटुंब आता एका नवीन मिशनवर निघाले आहे. खिचडी-2 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  फराह खानची झलक देखील दिसत आहे.


खिचडी-2 चित्रपटाची स्टार कास्ट


काही दिवसांपूर्वी  खिचडी-2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, त्यानंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुप्रिया पाठक व्यतिरिक्त जमनादास मजेठिया, राजीव मेहता, वंदना पाठक, अनंग देसाई, कीर्ती कुल्हारी, परेश गंत्रा, अनंत विधात, फराह खान आणि प्रतीक गांधी हे दिग्गज कलाकार या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आतिश कपाडिया यांनी केले आहे. खिचडीचा पहिला भागही त्यांनी दिग्दर्शित केला.   



खिचडी 2 आणि 'टायगर 3' ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर


खिचडी 2 चित्रपटाची  सलमान खानच्या अॅक्शन फिल्म 'टायगर 3' या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार  आहे. टायगर-2  हा चित्रपट  12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.






खिचडी चित्रपटाचा पहिला भाग 2010 मध्ये आला होता, ज्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता 13 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आला आहे.  अभिनेत्री निमिषा वखारिया (Nimisha Vakharia) यांनी खिचडी या चित्रपटात जयश्री ही भूमिका साकारली होती. आता खिचडी-2 (Khichdi 2) चित्रपटामधील ही भूमिका अभिनेत्री वंदना पाठक या साकारणार आहेत. प्रेक्षक खिचडी 2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Khichdi 2 Teaser: खिचडी- 2 चा धमाकेदार टीझर रिलीज; यंदाच्या दिवाळीला फुटणार हास्याचे फटाके,पारेख कुटुंब करणार प्रेक्षकांचे मनोरंजन