Pankaj Tripathi Main Atal Hoon Shooting Update : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'मैं अटल हूँ' या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारणी, पंतप्रधान, कवी अशा अनेक बाजू या मोशन पोस्टरच्या माध्यमातून उलगडण्यात आल्या होत्या. या सिनेमासाठी पंकज त्रिपाठी खूप मेहनत घेत आहेत.
पंकज त्रिपाठी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या लुकमध्ये दिसत होते. ही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला होता. तसेच रवी जाधव यांनीदेखील काल एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिलं होतं,"उद्या तब्बल 12 वर्षांनी माझ्या दुसऱ्या 'बायोग्राफीकल' चित्रपट 'मैं अटल हूँ'च्या चित्रीकरणाला प्रारंभ होत आहे. असाच आशीर्वाद असावा".
'मैं अटल हूँ' कधी होणार रिलीज? (Main Atal Hoon Release Date)
'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव सांभाळत आहेत. तर लॉरेन्स डी कुन्हा सिनेमॅटोग्राफी करत आहेत. डिसेंबर 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे.
पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेता आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत नाविण्य आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता अटलजींच्या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकज त्रिपाठींचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
संबंधित बातम्या