Sunny Deol Son Karan Deol Wedding Date : 90 च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny) लवकरच सासरे होणार आहेत. सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओल (Sunny Deol) यांचा मुलगा करण (Karan Deol) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 


करण देओलचा नुकताच साखरपुडादेखील झाला असून लवकरच तो बोहल्यावरदेखील चढणार आहे. देओल कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत करणचा साखरपुडा झाला. पण आता शाही थाटात त्याचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, करण देओल येत्या जून महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. 16-17 जूनला करण देओलचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 






सनी देओल यांच्या होणाऱ्या सुनबाईंबद्दल जाणून घ्या...


करण देओलच्या होणाऱ्या पत्नीचं नाव दृशा आचार्य (Drisha Acharya) आहे. गेल्या सहा वर्षांपासून करण आणि दृशा एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. दृशा ही फिल्ममेकर विमल रॉय यांची नात आहे. दृशी दुबईत राहत असून ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये ती काम करते. 


धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्याप्रमाणे करण देओलनेदेखील सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 2019 साली 'पल पल दिल के पास' (Pal Pal Dil Ke Pass) या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. करणचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्यामुळे करण नाराज झाला होता. त्यानंतर बॉबी देओल यांनी त्याला समजावलं होतं.  


साखरपुड्याप्रमाणे करण आणि दृशाचा लग्नसोहळादेखील कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत होणार आहे. पण या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतील. करण देओल आणि दृशाचा लग्नसोहळा मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एन्डमध्ये पार पडणार आहे. 


बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Dharmendra : वयाच्या 87 व्या वर्षी धमेंद्र रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत