पॉप गायिका केटी पेरी कायमच हिंदू परंपरा, संस्कृती यांचा आदर करताना दिसायची. 2010 मध्ये तिने राजस्थानमध्ये हिंदू पद्धतीने सात फेरे घेत रसेल ब्रँडशी लग्न केलं होतं. केटीने शरीरावर 'अनुगच्छती प्रवाह' हा संस्कृत भाषेतील टॅटू काढला आहे. त्यामुळे फोटो टाकताना देवतांचा अवमान करण्याचा तिचा हेतू नसावा, असं मानलं जात आहे.
केटीच्या पोस्टनंतर काही मिनिटांतटच तिच्यावर टीका करणाऱ्या कॉमेंट्सचा पूर आला. अनेकांनी तिच्या अकलेचे वाभाडे काढत अर्वाच्च शिवीगाळही केली. केटीने पोस्ट डिलीट करुन माफी मागावी, असंही तिचा सांगण्यात आलं.
नकारात्मक कॉमेंट्ससोबतच केटीच्या बाजूनेही अनेक चाहत्यांनी मत प्रदर्शित केलं. तिची समज, तिला इतर धर्माचं असलेलं आकलन आणि आस्था यावरही तिच्या फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला.
केटी पेरीची पोस्ट :