मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ मध्यरात्री मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये गेली होती. मध्यरात्री कतरिना हॉस्पिटलमध्ये गेल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, बदललेल्या वातावरणामुळे कतरिना आजारी पडली होती आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये गेली होती.

 

कतरिना कैफ सध्या तिचा आगामी सिनेमा ‘जग्गा जासूस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना मोरोक्को, मुंबई आणि लंडनमध्ये ये-जा करत असते. त्यामुळे वातावरणात वारंवार बदल होत असतो आणि याचा परिणाम आरोग्यावर होऊन कतरिना आजारी पडली होती. त्यामुळे मध्यरात्री कतरिनाला हॉस्पिटल गाठावं लागलं होतं.

 

मुंबई आणि मोरोक्को या दोन्ही शहरांमध्ये प्रचंड उन्ह आहे, तर लंडनमध्ये कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे या तिन्ही शहरात फिरताना कतरिनाला बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागतो.

 

कतरिना मध्यरात्री खारमधील हेल्थ केयर सेंटरमध्ये जवळपास 45 मिनिटं तपासणी करुन घरी परतली होती.