Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची लवकरच रेशीमगाठ जुळणार आहे. नुकतीच या दोघांच्या लग्नासंदर्भातील नवी माहिती समोर आलीय. कतरिना कैफ आणि विकी कौशल ( Katrina Kaif And Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय. मात्र, अद्याप कतरिना आणि विकी या दोघांनीही याबाबत काही अधिकृत घोषणा केलेली नाही.


मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याआधीच मिसेज अँड मिस्टर कौशल बनणार आहेत. कतरिना आणि विकी पुढील आठवड्यात कोर्ट मॅरेज करणार असल्याचं बोललं जातंय. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही विवाह सोहळ्यासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. 


अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचा विषय मागील बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 7 ते 9 डिसेंबर दरम्यान कतरिना आणि विकीचा राजस्थानमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, लग्न सोहळ्याआधी ही जोडी कोर्ट मॅरेज करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर कतरिना आणि विकी कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना सध्या तिच्या होणाऱ्या सासूसोबत लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. कतरिना आणि विकीचं डेस्टिनेशन वेडींग सुरुवातीपासूनच चर्चेत आहे.  त्यामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.


 


महत्त्वाच्या बातम्या :


26/11 Mumbai Attack : 'तो काळा दिवस'; अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट


83 Teaser Out: बहुचर्चित '83' चा टीजर आला, ट्रेलर आणि रिलिजच्या तारखाही ठरल्या, दीपिकानं दिली माहिती


Aarya 2 Trailer : 'आर्या-2' चा ट्रेलर प्रदर्शित; लेडी डॉनच्या भूमिकेत सुष्मिता सेन, दमदार लूक चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha