Mumbai Attack Movies : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाला. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 'मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला' या संकल्पनेवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात.
द अटॅक ऑफ 26/11 (The Attacks of 26/11)
मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी तसेच ही संपूर्ण घटना कशी घडली या विषयावर 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. 1 मार्च 2013 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
हॉटेल मुंबई (Hotel Mumbai)
ताज हॉटेलमध्ये झालेल्यामुळे हल्ल्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी अनेक विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये राहात होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहूण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
ताज महाल (Taj Mahal )
ताज महाल या चित्रपटाचे कथानक 18 वर्षाच्या एका फ्रान्समधील मुलीवर आधारित आहे, जी दहशतवादी हल्ला सुरू असताना हॉटेलच्या एका रूममध्ये अडकलेली असते.
वन लेस गॉड (One Less God)
वन लेस गॉड हा चित्रपट त्या परदेशी पर्यटकांवर आधारित आहे, जे दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. या चित्रपटात सुखराज दीपक, जोसेफ मल्हार, माहिका राव आणि कबीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
फॅन्टम (Phantom)
मुंबई हल्ल्यावर आधारित पुस्तक 'मुंबई एवेंजर्स' च्या कथानकावर 'फॅन्टम' या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली, या चित्रपटात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणाऱ्या हाफिज सईदची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11)
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स तसेच इतर स्टाफने कशी परिस्थिती हाताळली या सर्व गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली
महत्त्वाच्या इतर बातम्या :
26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... काळरात्र ठरलेला दिवस; थरारक, वेदनादायी आठवणी कायम
धैर्य, शौर्य, पराक्रम दाखवणाऱ्या 26/11च्या हल्ल्यातील वीरांना अभिवादन, ठिकठिकाणी श्रद्धांजली