83 Teaser Out: बॉलिवूड चित्रपट '83' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून 24 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलिज होतोय. दरम्यान आज या सिनेमाचा एक टीजर लॉन्च केला आहे. दीपिका पादुकोणनं Deepika Padukoneतिच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचा टीजर पोस्ट केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की, सिनेमा 24 डिसेंबर 2014 रोजी रिलिज होतोय तर ट्रेलर 30 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलिज होणार आहे. 






काही दिवसांपूर्वी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने इन्स्टाग्रामवर सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली होती. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत, कोविड प्रोटोकॉलचे पालन करून सर्व चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
 
हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता
कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. बऱ्याच वेळा चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अडचण होती. यंदाही हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
हे स्टार चित्रपटात दिसणार 
कबीर खान अभिनीत 83 चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या कथेवर आधारित आहे. टीम इंडियाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपला पहिला विश्वचषक जिंकला. रणवीर सिंग माजी क्रिकेटपटू कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीही आहे.