Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 2 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर त्याचे सिनेमे प्रदर्शित करत असतो. यंदादेखील तो 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 


'किसी का भाई किसी की जान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection)


फरहाद सामजी (Farhad Samji) दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 15.81 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 25 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. ईदची सुट्टी असल्याने सलमानच्या चाहत्यांची पाऊले 'किसी का भाई किसी की जान' पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे वळाल्याचं दिसून आलं आहे. 






पहिल्याच वीकेंडला पार करणार 100 कोटींचा टप्पा? 


सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडल्याने आता रिलीजच्या पहिल्या वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होऊ शकत नाही. पण 65-70 कोटींची कमाई हा सिनेमा करू शकतो. 


'मेरा कोई नाम नहीं है, लेकीन मैं भाईजान नामसे जाना जाता हूं' असे डायलॉग तसेच सिनेमातील हटके गाण्यांमुळे हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईजानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यार कमबॅक केलं आहे. या सिनेमातील भाईजानच्या हटके लूकचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 


'किसी का भाई किसी की जान'च्या स्टार कास्टबद्दल जाणून घ्या...


किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.  'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : शाहरुखच्या 'पठाण' पुढे फिका पडला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'; पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? जाणून घ्या...