श्रीदेवीमुळे मी नर्व्हस : कतरिना कैफ
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2017 03:27 PM (IST)
'जर श्रीदेवी तुम्हाला डान्स करताना पाहत असेल, तर तुम्ही काहीसे नर्व्हस दिसता' असं कॅप्शन कतरिनाने फोटोला दिलं आहे.
मुंबई : माधुरी दिक्षित, श्रीदेवी यासारख्या 80-90 च्या दशकातील डान्सर अभिनेत्री आजच्या काळातील अभिनेत्रींसाठी कायमच प्रेरणादायी ठरल्या आहेत. कतरिना कैफसाठीही श्रीदेवी इन्स्पिरेशनल आहे, त्यामुळे वर्कआऊट करताना शेजारी श्रीदेवीचा फोटो पाहूनही आपण नर्व्हस होत असल्याचं कतरिना सांगते. कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. वर्क आऊट आणि डान्स प्रॅक्टिसनंतरचा फोटो आहे. कतरिना थकून जमिनीवर बसली आहे. तिच्या शेजारी पाण्याची बाटली आहे, तर ती घामाघूमही झालेली दिसत आहे. फोटोमध्ये स्टुडिओच्या भिंतीवर श्रीदेवीचं पोस्टर दिसत आहे. 'जर श्रीदेवी तुम्हाला डान्स करताना पाहत असेल, तर तुम्ही काहीसे नर्व्हस दिसता' असं कॅप्शन कतरिनाने फोटोला दिलं आहे.