मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा पुन्हा प्रेग्नंट असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिल्पाने ही गूड न्यूज सर्वात आधी बहिण शमिता शेट्टीसोबत शेअर केली.
शिल्पा पुन्हा प्रेग्नंट असल्याची वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. परंतु ही थट्टा असल्याचं नंतर समोर आलं आहे. खरंतर शिल्पा पुन्हा आई बनणार नाही. ही थट्टा दिग्दर्शक अनुराग बासूने केली होती.
शिल्पा आणि अनुराग सध्या डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर-2'चे जज आहेत. या शोच्या ब्रेकदरम्यान शिल्पाची थट्टा करण्याची अनुरागला हुक्की आली. त्याने सेटवर शिल्पाचा फोन घेतला आणि त्यावरुन आपण प्रेग्नंट असल्याचा मेसेज बहिण शमिताला केला.
मेसेज वाचल्यानतंर शमिताला अतिशय आनंद झाला. तिने शिल्पाला फोन आणि मेसेज करुन शुभेच्छा दिल्या. काय सुरु आहे, हे आधी शिल्पाच्या लक्षात आलं नाही. ती शमिताला आपण प्रेग्नंट नसल्याचं समजावत होती.
हा अनुरागचा खट्याळपणा असल्याचं शिल्पाच्या काही वेळाने लक्षात आलं. यानंतर दोघेही झालेल्या प्रकारावर खूप हसले.