Phone Bhoot : रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा आगामी अॅडवेंचर कॉमेडी फोन भूत एका ट्विस्टसह सादर केला जाणार आहे. या चित्रपटात 'फोन भूत' (Phone Bhoot) या सिनेमात कतरिना कैफ (Katrina Kaif),  सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टरदेखील (Ishaan Khatter) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाचे एक हटके पोस्टर शेअर करून, निर्मात्यांनी या तारखेची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये मुख्य कलाकार दिसत असून हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.


काल कतरिनानं सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता टीझर शेअर करुन कतरिनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "लवकरच एक भन्नाट विनोदी सिनेमा घेऊन तुमच्या भेटीला येत आहोत".  गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.






'फोन भूत'  चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे.  रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी या चित्रपटाच्या कथानकाचे लेखन केलं आहे. 'फोन भूत' या सिनेमाचे शूटिंग 2020 मध्येच पूर्ण झाले आहे. 'फोन भूत' व्यतिरिक्त कतरिना सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये देखील दिसून येणार आहे. कतरिनाचा 'मेरी क्रिसमस' सिनेमादेखी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिनाचा नुकताच 'सूर्यवंशी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कतरिनाबरोबरच फोन भूत या चित्रपटामध्ये ईशान आणि सिद्धांत यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


हेही वाचा:


Phone Bhoot Teaser : कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार रिलीज