Katrina kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या 'फोन भूत' (Phone Bhoot) या सिनेमामुळे चर्चेत आहे. कतरिना, ईशान खट्टर (Ishaan Khatter)आणि सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi) स्टारर हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कतरिनाने तिच्या घरातील मौल्यवान वस्तूचा खुलासा केला आहे. 


प्रमोशनदरम्यान एका चाहत्याने कतरिनाला विचारले,"तुझ्या घरातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती?". यावर उत्तर देत बेबो म्हणाली,"माझ्या घरातील सर्वात मौल्यवान व्यक्ती म्हणजे माझा नवरा". कतरिनाच्या या उत्तराने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच कतरिना आणि विकीला एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


कतरिना कैफ पुढे म्हणाली,"माझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे माझी पुस्तके. कतरिनाचं हे गोड उत्तर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. कतरिना कैफ अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी कौशलवरील प्रेम व्यक्त करताना दिसत असते. 


कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कतरिना आणि विकीने राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये सात फेरे घेतले होते. 






कतरिनाचे आगामी सिनेमे


कतरिनाचा बहुचर्चित 'फोन भूत' हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तसेच 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' हे कतरिनाचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमांची कतरिनाचे चाहते प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


PHOTO: कतरिना कैफचा बॉसी लूक; 'फोन भूत'च्या प्रमोशन साठी सज्ज!