मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या 33 व्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावर पाऊल ठेवलं आहे. या निमीत्ताने चाहत्यांशी खास गप्पांचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना कतरिनाने उत्तरं दिली.

 

 

लग्नापासून ते आवडत्या गाण्यापर्यंतची विविध प्रश्न चाहत्यांनी विचारले. कतरिनाने देखील तेवढ्याच खास अंदाजात त्याला उत्तरं दिली. कतरिनाने आजच फेसबुक अकाऊंट सुरु केलं आहे. पहिल्याच दिवशी चाहत्यांशी लाईव्ह चाटच्या माध्यमातून संवाद साधला. वाढदिवसानिमीत्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल कतरिनाने सर्व चाहत्यांचे आभारही मानले.

 

कतरिनाच्या लाईव्ह चाटमधील काही रंजक प्रश्न आणि उत्तर

 

प्र. तुझी बहिण बॉवूडमध्ये कधी येणार?

उ. ती एक चांगली गायक असून उत्तम कलाकार देखील आहे. पण बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय कधी घेते ते पाहणं औत्युक्याचं ठरेल.

 

प्र. तुझं आवडतं गाणं कोणतं?

उ. तेरी ओर, सिंग इज किंग सिनेमा

 

प्र. रोमँटीक सिनेमा कधी करणार?

उ. येत्या 9 सप्टेंबरला बार बार देखो हा सिनेमा येत आहे. हा सिनेमा तुम्ही नक्की पाहू शकता.

 

प्र. स्त्री प्रधान सिनेमा कधी करणार?

उ. स्त्री प्रधान सिनेमा करण्याची इच्छा आहे. संधी येईल तेव्हा नक्की करणार.

 

प्र. लग्न कधी करणार?

उ. जेव्हा करीन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल.

 

पाहा लाईव्ह चाटचा व्हिडिओः