Karwa Chauth: सर्व प्रकारचे सण, उत्सव, परंपरा या बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघायला मिळतात. उद्या (13 ऑगस्ट) 'करवा चौथ' (Karwa Chauth) हा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त अविवाहित मुलीदेखील (ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे) या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडण्याची प्रथा आहे. काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा सण अगदी खास पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करणारे बॉलिवूड चित्रपट कोणते? ते जाणून घेऊयात...
कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham)
कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोले चुडीया हे गाणं आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या गाण्यात करीना कपूर, हृतिक रोशन, काजोल, शाहरुख खान हे सर्व जण 'करवा चौथ' हा सण साजरा करताना दिसत आहेत. अगदी खास पद्धतीनं या चित्रपटात करवा चौथ सण दाखवण्यात आला आहे.
बिवी नंबर 1 (Biwi No.1)
बिवी नंबर 1 या चित्रपटात अगदी खास पद्धतीनं करवा चौथचा सण दाखवण्यात आला आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात करवा चौथ हा सण ज्या सिनमध्ये दाखवण्यात आला आहे त्यामध्ये एका श्वानाची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात सलमान खाननं प्रेम ही भूमिका साकारली आहे. प्रेमचे विवाहबाह्य संबंध हे करवा चौथच्या सिनमध्ये त्याच्या पत्नीला म्हणजे पूजाला कळतात. त्यामुळे पूजा आणि प्रेम यांचा हा करवा चौथचा सण अगदी अनोख्या पद्धतीनं या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge)
1995 मध्ये रिलीज झालेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या एव्हर ग्रीन चित्रपटामध्ये देखील करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. राज आणि सिमरन यांनी या चित्रपटामध्ये करवा चौथ हा सण अत्यंत खास पद्धतीनं साजरा केला.
हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam)
1999 मध्ये रिलीज झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील 'चांद छुपा बादल में शरमा के मेरी जाना' या गाण्यात अगदी खास पद्धतीनं करवा चौथ हा सण साजरा करण्यात आला आहे. या गाण्यात करवा चौथ हा सण दोन वेळा साजरा करण्यात आला. ऐश्वर्या ही या चित्रपटात नंदिनी ही भूमिका साकरते. नंदिनी ही एका सिनमध्ये समीरसोबत हा सण साजरा करताना दिसत आहे तर दुसऱ्या सिनमध्ये ती वनराजसोबत हा सण साजरा करते. चित्रपटात समीर ही भूमिका सलमान खाननं साकारली आहे. तर वनराज ही भूमिका अजय देवगणनं साकारली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Karwa Chauth 2022 : करवा चौथच्या थाळीत 'या' गोष्टींचा समावेश आवश्यक; चुकूनही टाळू नका, अन्यथा...