बंगळुरु : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या कर्नाटकातील नव वर्ष स्वागतानिमित्त डान्स शोवरुन वाद सुरु आहे. या वादात आता कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनीही उडी घेतली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी सनीने भरतनाट्यम सादर करावं, असा अजब सल्ला कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिला आहे.
रामालिंगा म्हणाले की, "मी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना कार्यक्रमास परवानगी देण्यास नकार दिला आहे. जर आयोजकांना परवानगी हवीच असेल, तर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करावं. तसेच या कार्यक्रमात सहभागी कलाकरांनी भरतनाट्यम सादर करावं.”
सनी लिओनीचा 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त डान्स शोचं आयोजन केलं आहे. पण या कार्यक्रमाला कर्नाटक रक्षा वेदिका(केआरवी) सह अनेक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच कर्नाटक रक्षना वेदिका युवा सेनेने हा कार्यक्रम रद्द केला नाही, तर सामूहिक आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.
कर्नाटक रक्षना वेदिका युवा सेनेच्या मते, "सनी लिओनीला आमंत्रित करणं म्हणजे शहराच्या सांस्कृतिवर घाला घालण्याजोगे आहे."
दरम्यान, या कार्यक्रमाविरोधात गेल्या आठवड्याभरापासून केआरवी संघटना कमालीची आक्रमक झाली आहे. संघटनेने सनी लिओनीविरोधात तीव्र आंदोलन करत, अनेक ठिकाणी मोर्चेही काढले होते. शिवाय, या मोर्चानंतर सनी लिओनीच्या पुतळेही जाळले होते.
‘नवीन वर्षाच्या स्वागताला सनी लिओनीने भरतनाट्यम सादर करावं’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2017 11:18 PM (IST)
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी सनीने भरतनाट्यम सादर करावं, असा अजब सल्ला कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिला आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -