Karisma Kapoor Domestic Violence: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते. 


Karisma Kapoor Domestic Violence: करिश्मानं केला घरगुती हिंसाचाराचा आरोप 



करिश्माने संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. तसेच करिश्मानं संजय आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण अनेक दिवस कोर्टात सुरू होते. करिश्माने तिच्या याचिकेत म्हटले होते की, संजय तिला खूप त्रास देत होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करिश्माने तिच्या याचिकेत एका घटनेचा उल्लेख केला होता. करिश्माने सांगितले होते की, एकदा संजयने तिच्यासाठी ड्रेस आणला होता. त्याने तो ड्रेस तिला घालण्यास सांगितला. जेव्हा करिश्माला तो ड्रेस फिट बसत नव्हता. त्यानंतर संजयनं त्याच्या आईला करिश्माच्या कानाखाली मारायला सांगितली.


संजय (Sanjay Kapur) विरोधात केलेल्या तक्रारीत करिश्मानं सांगितलं होतं की, “मला हे देखील समजले होते की त्याने माझ्याशी लग्न केले आहे कारण मी एक प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपट स्टार आहे.  त्याला देखील प्रसिद्ध व्हायचे होते, परंतु त्याने असं काहीच केलं नव्हतं ज्यानं त्याला प्रसिद्धी मिळाली असती. त्याला कोणाचंही लक्ष वेधता आलं नाही. म्हणूनच, त्याने दिल्लीतील काही उच्चभ्रू लोकांमध्ये  ट्रॉफी पत्नी म्हणून मला दाखविण्याचा निर्णय घेतला जिथे तो प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत होता.”


बरेच दिवस कोर्टात केस सुरु होती, त्यानंतर 2016 मध्ये संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर संजयनं प्रिया सचदेवसोबत दुसरं लग्न केलं. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव समायरा आहे तर मुलाचं नाव कियान असं आहे. करिश्मा तिच्या मुलांसोबत रहाते. तिनं दिल तो पागल है, रिश्ते, बीवी नंबर वन, हीरो नंबर वन और राजा बाबू यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Karisma Kapoor : 'पुन्हा लग्न करणार का?'; चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मानं दिलेल्या उत्तरानं वेधलं अनेकांचं लक्ष