Karisma Kapoor : जवळपास सगळ्याच चित्रपटात अभिनेत्री संकटात सापडते आणि अभिनेता तिची सुटका करतो, असा प्रसंग असतो. सिनेरसिकही अशा सीनवर जोरदार टाळ्या-शिट्या वाजवून चांगला प्रतिसाद देतात. मात्र, एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री करिश्मा कपूरनेच (Karisma Kapoor) आपल्या सहकलाकाराचा जीव वाचवला. चित्रपटातील दृष्यात अभिनेता अभिनेत्रीचा जीव वाचवतो असे दृष्य होते. मात्र, प्रत्यक्षात उलटंच घडले असल्याचा अभिनेता हरीश कुमारने सांगितले. एका मुलाखतीत त्याने ही घटना सांगितली.
अभिनेता हरीश कुमार आणि करिश्मा कपूर यांनी 1991 मध्ये प्रेम कैदी या चित्रपटात काम केले होते. करिश्मा कपूरचा हा पहिलाच चित्रपट होता. आजही अनेकांना हा चित्रपट त्याच्या कथानकासाठी आणि हरीश कुमारने साकारलेल्या खतरनाक व्यक्तीरेखेमुळे अनेकांच्या स्मरणात आहे. अभिनेता हरीश कुमारने Instagrant Bollywood ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेला किस्सा सांगितला आहे.
नेमकं काय झालं?
चित्रपटाच्या एका दृश्यात हरीश कुमार हा करिश्माला वाचवतो असे दाखवण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात सेटवर उलटे झाले. हरीश कुमारने त्या घटनेबद्दल सांगितले की, 'जेव्हा करिश्माने स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्यानंतर मी देखील त्यात उडी मारतो आणि तिचा जीव वाचवतो असे दृष्य आहे. मी करिश्माला वाचवण्यासाठी उडी मारली होती, पण प्रत्यक्षात करिश्माने मला वाचवले असल्याचे हरीश कुमारने म्हटले.
करिश्माने वाचवला जीव...
हरीश कुमारने म्हटले की, मला पोहता येत नव्हते आणि पाण्यात बुडू लागलो. मी आरडाओरडा सुरू केला तेव्हा अनेकांना वाटलं की प्रँक करतोय. पण, करिश्मा कपूरने प्रसंगाचे गांभीर्य ओळखत मला पकडले. मी तिचे कपडे पकडले आणि तिने मला वाचवले असल्याचे करिश्माने सांगितले.
17 व्या वर्षी करिश्माचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
'प्रेम कैदी' चित्रपटाचे दिग्दर्शन के मुरली मोहन राव यांनी केले होते. चित्रपटात दलीप ताहिल, परेश रावल, असरानी, शफी इनामदार, भारत भूषण आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Prema Khaidi या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अभिनेत्री करिश्मा कपूर 17 वर्षांची होती. तर, अभिनेता हरीश कुमारहा तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान होता.
कोणत्या सीनच्या वेळी झाली ही घटना पाहा व्हिडीओ : Karishma Kapoor Teasing Harish | Prem Qaidi Hindi Movie Scenes |