Samayra Kapoor Fees: दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या (Sanjay Kapoor) मालमत्तेवरून सध्या मोठा वाद रंगलाय. करिष्मा कपूरची मुलगी समायरा कपूर आणि तिच्या भावाने प्रिया सचदेव यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. संजय कपूर यांचं मृत्युपत्र चुकीचे असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. मागील सुनावणीत समयरा कपूरने आरोप केला होता की तिचे दोन महिन्यांची फीस अद्याप भरली गेलेली नाही. यावर कोर्टानेही दोन्ही पक्षांना अनावश्यक मेलोड्रामा करू नये असे सांगितले होते. दरम्यान आता प्रिया सचदेवच्या वकिलांनी न्यायालयात समयरा कपूरच्या फीसची पावती सादर केली आहे.

Continues below advertisement

इस्टेटीवरून सुरू असलेल्या  कायदेशीर वादाच्या पार्श्वभूमीवर करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूर कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेते आणि तिच्या अमेरिकेतील खर्चाचा या वादाशी कसा संबंध आहे? याविषयीची उत्सुकता वाढली आहे. कोर्टात आलेल्या माहितीनुसार समायराच्या विद्यापीठाची सुमारे 95 लाख रुपये फी एका सेमिस्टरची आहे. ही फीस दोन महिन्यांपासून न भरल्याचे समोर आले आहे.

किती आहे समायराची फी?

प्रिया सचदेव यांच्या वकील शैल त्रेहन यांनी कोर्टात सादर केलेल्या अनेक कागदपत्रानुसार, मुलांची विद्यापीठाची फीस न भरल्याचा आरोप खोडून काढण्यात आला आहे. त्यांनी 95 लाख रुपयांच्या प्रति सेमिस्टर फीची पावती कोर्टात सादर केली असून ती आधीच भरली गेल्याचं म्हटलं आहे. पुढील सेमिस्टर ची फी डिसेंबर मध्ये भरायची असल्याचेही त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

तिचा प्रमुख विषय (major) सार्वजनिकरीत्या नमूद नाही, मात्र काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तिची ट्युशन फी प्रति सेमिस्टर जवळपास 95 लाख रुपये आहे. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार पदवी अभ्यासक्रमासाठी वार्षिक फी सुमारे 95,000 अमेरिकन डॉलर आहे, ज्यामुळे हे अमेरिकेतील सर्वात महागड्या विद्यापीठांपैकी एक मानले जाते.

कुठे शिकते समायरा ?

समारा कपूरच्या शिक्षणाबद्दल मिळालेला माहितीनुसार तिचे सुरुवातीचे शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून पूर्ण झालं आहे. सध्या ती अमेरिकेतील टफ्टस युनिव्हर्सिटी, मॅसॅच्युसेट्स येथे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. करिष्मा कपूरची मुलगी असूनही समायरा लाईन लाईट पासून दूर राहणं पसंत करते. तिचं सोशल मीडिया अकाउंटही प्रायव्हेट आहे. समायराच्या LinkedIn प्रोफाइलनुसार ती 2023 मध्ये अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथून पदवीधर झाली आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. सध्या ती अमेरिकेतील एका विद्यापीठात दाखल असून तिचा अभ्यासक्रम 2027 मध्ये पूर्ण होणार आहे.

समायरा आणि तिचा भाऊ किआन यांनी सुनजय कपूर यांच्या मृत्युपत्राला आव्हान दिले आहे आणि त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. PTIच्या माहितीनुसार, प्रिया कपूर यांच्या सहा वर्षांच्या मुलाने या आव्हानाला विरोध दाखल केलाय.