Pankaj Tripathi daughter acting debut: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये स्टार किड्सच्या डेब्यूवर चर्चा होत आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याने नादान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. शाहरुखचा मुलगा आर्यन खानही ब्रेकिंग ऑफ बॅड्स या ओटीटी सिरीजच्या माध्यमातून सध्या लोकप्रिय होत आहे. दरम्यान आणखी एक 'Star kid' मनोरंजनाच्या ग्लॅमरस जगात पाऊल टाकत आहे. ती व्यक्ती म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची मुलगी आशी त्रिपाठी.  

Continues below advertisement


लेकीला पडद्यावर पाहून पंकज म्हणाले...


गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी बॉलीवूडच्या किंबहुना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी आशी त्रिपाठीही तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात करत आहे. 'रंग डारो' या म्युझिक व्हिडिओतून आशी त्रिपाठीने तिचे पदार्पण केले आहे. मुलीला पहिल्यांदाच पडद्यावर पाहून पंकज त्रिपाठी ही भावुक होताना दिसले. " आशीला पडद्यावर पाहण्याचा अनुभव हा आमच्या दोघांसाठी खूप हृदयस्पर्शी आणि आनंदाचा क्षण होता. अभिनय करण्यासाठी ते कायमच उत्साही होती. तिच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिचा नैसर्गिक वावर पाहणं हे खरोखरच खास होतं. जर हे तिचं पहिलं पाऊल असेल तर तिचा पुढचा प्रवास तिला कुठे घेऊन जातो हे पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचं पंकज त्रिपाठी म्हणाले. आयएएनएस  वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.


पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला त्रिपाठी यांनीही मुलीच्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या ' जेव्हा आशीला संधी मिळाली तेव्हा तिच्या कलात्मक संवेदनशीलतेला जुळणार काहीतरी तिने करावं असं वाटत होतं. 'रंग डारो' हा एक सुंदर आणि अद्भुत प्रोजेक्ट आहे. आपल्या भावनांना पडद्यावर जिवंत करताना पाहणं हे फार सुंदर होतं. तिला या क्षेत्रात वाढताना आणि तिचा मार्ग शोधताना पाहण्याचा आम्हाला खूप आनंद झालाय. असं त्या म्हणाल्या.


पंकज त्रिपाठीची मुलगी किती शिकलीय ?


पंकज त्रिपाठीची मुलगी आशी त्रिपाठी ही इतर स्टार किड्स सारखी नाही. ती फारशी प्रसिद्धीझोतात राहत नाही. फक्त 18 वर्षांची असलेली आशी सध्या मुंबईतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मध्यंतरी तिने instagram वर अकाउंट उघडत एक पोस्ट केली होती. ज्यात कुटुंबासोबत वाराणसीला गेलेल्या सहलीत आईची साडी नेसली आहे. 


रंग डारो .. गाण्यातून पदार्पण 


शिरीन आनंद दुबे यांनी लिहिलेलं 'रंग डारो' हे अप्रतिम गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  मैनक भट्टाचार्य, संजना राजनारायण या गायकांनी या शब्दांना पूर्णपणे न्याय दिला आहे. आशी त्रिपाठीनं या गाण्यातून पदार्पण केलं आहे.  सुंदर साडी, मोकळे केस डोळ्यात काजळ अशा मोहक रूपात आशी खूपच सुंदर दिसतेय.  या गाण्यात तिचं चित्र काढणारा चित्रकार तिच्या प्रियकराच्या रूपात आहे.