मुंबईबाहेर असलेल्या सोनवे गावामधलं जंगल ऋतुजाने तैमूरला गिफ्ट दिलं आहे.
तैमूर अली खानच्या बुटांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
ऋतुजा दिवेकरने इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन जंगलाचा फोटो शेअर केला आहे. 'एका लहान मुलाला पक्षी, फुलपाखरं कधीच पुरेशी पडणार नाहीत. त्यामुळे आम्ही सोनवेमध्ये लहानसं जंगल छोटुकल्या तैमूरला बर्थडे गिफ्ट देत आहोत' असं कॅप्शन ऋजुताने दिलं आहे.
तैमूरने पतौडीमधील सैफच्या घरात जवळच्या नातेवाईकांसोबत बर्थडे साजरा केला. यावेळी तैमूरची मावशी करिष्मा कपूर, तिची मुलं कियान आणि समायरा, आजी बबिता आणि आजोबा रणधीर कपूर होते.
करिना आणि सैफ अली खान यांचं लग्न 2012 मध्ये झालं होतं. तैमूर हा करिना-सैफ यांचं पहिलं अपत्य आहे. सैफला पहिली पत्नी अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.