Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह (Taimur-Jeh) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. तिघांना अनेकदा स्पॉट केले जाते. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ अली खानला पापाराझी किंवा मीडियासमोर पोज देणे आवडत नसल्याचे करीना कपूर खानने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. 


करीना कपूर खान सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आता करीनाने इंस्ट्राग्राम स्टोरीवर सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,"सैफ अली खानला पापाराझी किंवा मीडियासमोर पोज द्यायला आवडत नाही. त्याला शांतता आवडते. मात्र मला आणि तैमूर-जेहला पापाराझींसमोर पोज द्यायला आवडते".  



सैफ अली खानचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. ओम राऊतच्या आदिपुरुष सिनेमात सैफ प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमात तो रावणाची भूमिका साकारणार आहे. सैफ अली खान आणि प्रभास व्यतिरिक्त या सिनेमात कृती सेनन मुख्य भूमिकेत आहे. सैफचा 'विक्रम वेधा' सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





 


संबंधित बातम्या


Bollywood Celebrity : फोटोत चेहरा बनवणारी ही मुलगी शेरो शायरीची आहे शौकीन, ओळखलंत का या बॉलिवूड ब्युटीला?


Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर


Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' लवकरच होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha