Kareena Kapoor On Tough Marriage With Saif:  बॉलीवूडमधल्या सगळ्यात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेलं जोडपं म्हणजे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan). सैफ आणि करिनाने 2012 मध्ये लग्नगाठी बांधली. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरु झाला. त्यांना तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) अशी दोन मुलं देखील आहेत. पण नुकतच करिना आणि सैफच्या संसाराविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वत: करिनानेच य गोष्टीचा खुलासा केला आहे. 


द वीकला दिलेल्या मुलाखतीमध्ये करिनाने त्यांच्या संसाराविषयी भाष्य केलं आहे. यावेळी तिने सांगितलं की, एकमेकांसाठी वेळ काढणं आमच्यासाठी बऱ्याचदा कठिण होतं, त्यावरुन आमच्यात बरीच भांडणं देखील होतात. 


एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही सैफ करिना


करिना आणि सैफ यंदा त्यांच्या लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या सगळ्यामध्ये करिनाने 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत एका अभिनेत्याशी लग्न करताना येणाऱ्या अडचणींबद्दल मोकळेपणाने सांगितले. तिने एक प्रसंग सांगत म्हटलं की, एकदा सैफ पहाटे साडेचार वाजता आला आणि झोपून गेला, तेव्हा मी कामावर गेले. माझ्या जाण्यानंतर तो देखील शुटींगला गेला, तेव्हा मी दुसऱ्या दिवशी बँकॉकला जाण्याची तयारी करत होते. 


पुढे तिने म्हटलं की, अशा स्थितीत, आम्ही एकाच घरात असूनही एकमेकांना भेटत नाही. वेळ मॅनेज करणं कठिण होतं. जेव्हा घरात दोन कलाकार असतात तेव्हा असंच होतं. 






करिना आणि सैफमध्ये का होतात भांडणं?


करिनाने असेही सांगितले की, 'वेळेमुळे' आणि जेव्हा ते एकमेकांना भेटू शकत नाहीत तेव्हा त्यांच्यात बहुतेक वेळा भांडणे होतात. अभिनेत्री म्हणाली की ते पैशासाठी भांडत नाहीत, परंतु काहीवेळा, जेव्हा सैफ तैमूरला "थोडा वेळ" जागे राहण्याची परवानगी देतो, तेव्हा ती चिडते. दरम्यान एसीचं तापमान यावरुन देखील करिना आणि सैफमध्ये भांडणं होत असल्याचं तिने सांगितलं आहे.  


ही बातमी वाचा : 


Lalita Dsilva : अनंतपासून ते करिनाच्या जेहपर्यंत 'या' नॅनीने केला अनेक स्टारकिड्सचा सांभाळ, महिन्याला दीड लाख रुपये पगार