मुंबई : बॉलिवूडची लाडकी बेबो करिना कपूरच्या प्रेग्नन्सीबाबत अनेक वेळा अफवा उठताना दिसतात. सैफ आणि करिना यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या बातम्यांना उत आला असताना करिनाने पुन्हा या अफवा उडवून लावल्या आहेत. एकीकडे करिनाचा एक्स बॉयफ्रेण्ड शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्याकडे गोड बातमी असल्याच्या चर्चा असताना करिनाबाबतच्या अफवांनीही फेर धरला होता.

 
वांद्र्याच्या सीताराम मेडिकल सेंटरमधील गायनॅकॉलॉजिस्टकडे करिना कपूरने सोनोग्राफीसाठी हजेरी लावल्याची पुडी एका फॅनने सोडली. गेल्या काही महिन्यात करिनाने एकही नवीन सिनेमा स्वीकारला नसून अनेक ऑफर धुडकावल्या आहेत. शिवाय मुंबई भेटीवर आलेले ब्रिटनचे पाहुणे प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांच्या डिनरलाही तिने जाणं टाळलं आहे. यामुळे करिना प्रेग्नंट असल्याचे तर्कवितर्क लढवले जात होते.

 
करिनाच्या जवळच्या व्यक्तीने 'डीएनए' वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार 'करिना बिजांडं गोठवून ठेवत आहे. तिशीच्या घरातील अनेक करिअर वुमन सध्या हा पर्याय निवडताना दिसतात. तिने हा उत्तम निर्णय घेतला आहे.'

 
करिनाला या मुद्द्यावर प्रश्न विचारला तेव्हा 'काय वेडेपणा आहे हा' असं उत्तर तिने हसत-हसत दिलं. 'मी प्रेग्नंट नाहीये. पुढची किमान दोन वर्ष आम्ही बाळासाठी प्लानिंग करत नाहीयोत. लोक काहीपण बडबडतात. मी कुठल्याही गायनॅककडे गेली नाही. जेव्हा आम्हाला बाळ हवं असेल, तेव्हा मी नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करेन. बिजांडं गोठवण्यावर माझा विश्वास नाही.' असा खुलासा करिनाने केला आहे.

 

 

संबंधित बातम्या :


शाहिद कपूरच्या घरी लवकरच 'कुणीतरी येणार गं' ?