सनी लिऑनच्या 'वन नाइट स्टॅण्ड' सिनेमातील नवं गाणं रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2016 10:17 AM (IST)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचा सिनेमा 'वन नाइट स्टॅण्ड'चं नवं गाणं इजाजत नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. अरिजीत सिंहनं हे गाणं गायलं असून मीत ब्रोनं हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं सनी लिऑन आणि अभिनेता तुनज विरानीवर शूट करण्यात आलं आहे. या सिनेमाचा टीझरही हॉट सीन्सनं भरलेला आहे. नेहमीप्रमाणेच सनी लिऑन या सिनेमातही हॉट आणि सेक्सी अवतारात पाहायला मिळणार आहे. एक रात्र आणि त्या एका रात्रीत काय-काय घडतं यावर हा सिनेमा बेतलेला आहे. जॅस्मीन डिसूजा दिग्दर्शित या सिनेमात सनी लिऑन आणि अभिनेता तनुज विरानी प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 22 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.