मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. आपल्या ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच शेअर करत असते. अशातच ती आपल्या कुटुंबासोबतचेही फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या कुटुंबाचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. सध्या करिनाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो तिच्या लंडन ट्रिपचा असून करिना आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत एका पार्कमध्ये मस्ती करताना दिसत आहे. 


फोटोंमध्ये करिना व्यतिरिक्त तिचा पती अभिनेता सैफ अली खान, मुलगा तैमूर, बहिण करिश्मा कपूर आणि तिची दोन मुलं समायरा आणि कियान, करिनाची आई बबिता फोटोमध्ये दिसून येत आहेत. फोटोमध्ये काळ्या रंगाच्या टँक-टॉपमध्ये करिना क्लासी दिसत आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये आणखी एका फॅमिली ट्रिपवर जाण्यासाठी ती आणखी वाट पाहू शकत नाही.    


करिनाने लिहिलं आहे की, "नेहमीच एकत्र आनंदी, पीएस : लंडन, मी पुन्हा जाण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही." करिश्माने करिनाने शेअर केलेला हा फोटो रीपोस्ट केला आणि लिहिलं की, "वाट पाहू शकत नाही." तसेच तिने फोटो शेअर करत एक हार्ट इमोजीही शेअर केला आहे. 



यापूर्वी अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपला एक सेल्फी शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करिना कपूरने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्यानंतर तिने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली आहे. करिनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिना कपूर यापूर्वी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसून आली होती. दिवंगत अभिनेता इरफान खानचा हा शेवटचा चित्रपट ठरला. करिनाने लवकरच अभिनेता आमीर खानसोबत 'लाला सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :