पॅरिसमध्ये अभिनेत्री किम कर्दाशियनच्या डोक्यावर बंदूक रोखली!
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 10:25 AM (IST)
पॅरिस : रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. किम कर्दाशियन सध्या फ्रान्समधील पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये आहे. किमसोबत पॅरिसमध्ये तिची आई क्रिस जेन्नर, बहीण कोर्टनी कर्दाशियन आणि केन्डल जेन्नर आहे. पॅरिस फॅशन वीकसाठी आलेली किम कर्दाशियन ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. तिथे पोलिसांच्या यूनिफॉर्मधील दोघा अज्ञातांनी किमच्या डोक्यावर बंदूक रोखली. यावेळी किम आणि त्या अज्ञात व्यक्तींमध्ये झटापट झाली. सुदैवाने किमला कोणत्याही प्रकारची शरीरिक दुखापत झाली नाही.", असे किम कर्दाशियनच्या प्रवक्त्याने 'सीएनएन'शी बोलताना सांगितले. किम कर्दाशियनचा पती या घटनेच्या आदल्या रात्रीच मिडॉ फेस्टिव्हलसाठी न्यूयॉर्कला रवाना झाला होता.