Karan Johar : बॉलीवूड सिनेमांमधलं करण जौहर (Karan Johar) हे एक आघाडीचं नाव आहे. अनेक बॉलीवूडच्या कलाकारांचं पदार्पण हे करण जौहरच्या सिनेमातून झालंय. त्याच्या कॉफी विथ करण हा कार्यक्रमही विशेष चर्चेत असतो. दरम्यान अनेक गोष्टींमुळे करण जौहर हा कायमच चर्चेत असतो. पण नुकतच करणने त्याच्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. 


करण जौहरला कायम त्याच्या कपड्यांवरुन, बऱ्याचदा त्याच्या वागणुकीवरुन ट्रोल केलं जातं. पण त्या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो तर कधी जशास तसं उत्तरही देतो. करणने नुकतच फेय डिसूझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्याविषयी भाष्य केलं आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या शरीराविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 


करणने काय म्हटलं?


करण त्याच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो. या मुलाखतीमध्ये करणने म्हटलं की, माझ्या शरीराबद्दल अजिबात आनंदी नाही. ज्याप्रकारे माझं शरीर आहे, मी जसा दिसतो, जसा आहे, त्याबाबत मला कायम अवघडल्यासारखं वाटतं. होय मला माझ्या शरीराबद्दल न्यूनगंड आहे आणि म्हणून मला आत्मविश्वासही मिळत नाही. मी लहान असताना देखील मला असंच वाटायचं. माझ्या शरीराबाबत आत्मविश्वास मिळवण्याचा, तसेच हे जे काही माझे विचार आहेत, ते थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही. 


पुढे त्याने म्हटलं की, 'मा‍झ्या या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही सापडलं नाहीये. म्हणजे मी कितीही वजन कमी केलं तर मला असंच वाटत राहतं की, मी जाड आहे आणि त्याचमुळे मी ढगळे कपडे घालणं पसंत करतो. आठ वर्षांचा असल्यापासूनचे माझे हे विचार आहे आणि आजही त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे मला स्वत:च्याच शरीराची लाज वाटते.' 


यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो - करण


माझ्या या विचारांमुळे माझ्या मानसिक आरोग्यावरही या गोष्टीचा परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही थेरपी किंवा सल्ल्याने माझ्या या अडचणी कमी झालेल्या नाहीत. या गोष्टीचा मला जास्त त्रास होत असतो. म्हणून माझ्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अनेकदा मला या गोष्टींमुळे पॅनिक अटॅक देखील आले आहेत.                   


ही बातमी वाचा : 


Kushal Badrike : 'हिंदी म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठ्ठी संधी, असं मला वाटत नाही'; कुशल बद्रिकेने असं का म्हटलं?