Avatar The Way Of Water : जेम्स कॅमेरॉनच्या (James Cameron)   'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील  VFX आणि या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हा चित्रपट आज (7 जून) ओटीटीवर रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


एका रिपोर्टनुसार,  अवतार: द वे ऑफ वॉटर हा चित्रपट प्रेक्षकांना Disney प्लसवर 12:00 Am पॅसिफिक टाइमला आणि 3:00 AM ईस्टर्न टाइमला आज म्हणजेच 7 जून रोजी ( बुधवार) पाहता येणार आहे. तसेच मॅक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. 


'अवतार : द वे ऑफ वॉटर' ची स्टार कास्ट


'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सॅम वर्थिंग्टन  जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.  तसेच जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 






'अवतार 2'  हा चित्रपट भारतात  हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.


अवतार 2 हा थिएटरमध्ये  15 डिसेंबर 2022 रोजी रिलीज झाला होता. आता थिएटर रिलीजनंतर 173 दिवसांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  वीकेंडला ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) बघायला प्रेक्षकांना आवडतात. आता  'अवतार द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संंबंधित बातम्या


New Release On OTT: ओटीटीवर अॅडव्हेंचर आणि थ्रिलरचा तडका; या आठवड्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज