मुंबई: कपिल शर्माच्या शोमध्ये निर्माता साजिद नाडियावालाने नुकतंच त्याच्या टीमसोबत उपस्थिती लावली. या एपिसोडमध्ये साजिद आणि कपिल शर्माने क्रृती सेनन, टायगर श्रॉफ आणि अहान शेट्टीसोबत खूप धमाल केली आहे. नुकताच या शोचा नवीन प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. साजिद नाडियावालाने जॅकी श्रॉफशी संबंधित एक भन्नाट किस्सा यावेळी शोमधे शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये साजिदने प्रेक्षकांना सांगितले की जॅकी श्रॉफने टायगरला स्टार करण्याची जबाबदारी त्याच्यावर कशी सोपवली होती. 


साजिद नाडियाडवाला चित्रपट जगतातील उत्तम निर्मात्यांपैकी एक आहे. साजिदने बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटामध्ये अनेक नवीन चेहरेही लॉन्च झाले आहेत. बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ साजिद नाडियावाला निर्मित 'हिरोपंती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बऱ्याच वर्षांनी ही जोडी परत एकदा कपिलच्या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. यात साजिद नाडियावाला याने जॅकी श्रॉफशी संबंधित फारच मजेशीर किस्सा सांगितला, हा किस्सा ऐकूण सगळेच पोट धरुन हसायला लागले. 


कपिलने त्याच्या शैलीत एक प्रश्न साजिद यांना विचारला. त्यावर निर्माता साजिद नाडियावाला यांनी जग्गुदादाची पोलखोल केली. कपिलने प्रश्न विचारला की, जेव्हा तुम्ही टायगर श्रॉफला लॉन्च केले होते, तेव्हा जॅकी दादा तुम्हाला काय म्हणाले होते?  त्यावर उत्तर देताना साजिद नाडियावाला यांनी जॅकी श्रॉफच्या स्टाइलने दिलं. उत्तराची सुरुवात करताना साजिदने तीन वेळा 'भीडू' लावत सूर पकडला. साजिद म्हणाले की, आजपासून टायगर तुमचा मुलगा आहे असं जॅकी दादाने सांगितलं.


पुढे साजिद म्हणाले की, "दादा एक दिवशी म्हणाले भीडू…भीडू… माझं काम होतं फक्त मुलाला जन्म देणं, आता त्याला स्टार तुला करावं लागेल. 


साजिदचा संवाद संपताच कपिल शर्मा, टायगर श्रॉफ, क्रृती सेनॉन, अहान शेट्टी आणि समोर बसलेले प्रेक्षक जोरजोरात हसायला लागले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha