मुंबई: नवीन वर्ष कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक खुशखबरी घेऊन आले आहे. आपल्या अनोख्या शैलीनं टीव्हीवरील प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. तशी कपिल शर्माने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
सोमवारी कपिल शर्माने इंग्रजीत 'शुभ समाचार' ला काय म्हणतात असा प्रश्न आपल्या चाहत्यांना विचारला होता. त्यावर अनेकांनी त्याला रिप्लाय देत वेगवेगळे शब्द सुचवले होते. त्यानंतर कपिल शर्माने दुसऱ्या दिवशी शुभ समाचार म्हणजे Auspicious News शेअर करणार असल्याचं सांगितलं होते.
मंगळवारी त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय पण त्यामध्ये त्याला यश येत नसल्याचं दिसतंय. त्यावर त्याच्या जवळ उभा असलेला कॅमेरामन कपिल शर्माला हिंदीत बोललं तरी चालेल असं म्हणतो. हा व्हिडिओ मजेशीर आहे.
त्यानंतर कपिल शर्मा म्हणतो, "मी आपल्या टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइल वर म्हणजेच नेटफ्लिक्सवर येत आहे. ही एक खास बातमी आहे." या व्हिडिओला शेअर करत नेटफ्लिक्सने लिहलंय की' "तुम्ही हिंदीत सांगा किंवा इंग्रजीत सांगा, सगळं एकच आहे. कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे. ...तुम्ही कधी येताय?"
संबंधित बातम्या: