मुंबई : सेलिब्रिटी कपल्स, अर्थात सोलिब्रिटी जोड्या चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय. याबाबत चाहत्यांच्या वर्तुळात बऱ्या चर्चांनाही वाव मिळतो. अर्थात या चर्चांना खतपाणी देणारेही हे सेलिब्रिटीच, असं म्हणणं सध्या वावगं ठरणार नाही. कारणही तसंच आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर याचा भाऊ आणि नवोदित अभिनेता इशान खट्टर(Ishaan Khatter) कलाविश्वात चांगलाच प्रकाशझोतात आहे.


इशान त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच नृत्यकौशल्य आणि आता तर त्याच्या खासगी जीवनामुळेही चर्चेत आहे. याला कारण ठरत आहे, एका लोकप्रिय अभिनेत्यासह जोडलं जाणारं त्याचं नाव. हा अभिनेता म्हणजे चंकी पांडे आणि त्याची मुलगी म्हणजेच अनन्या पांडे.


अनन्या आणि इशान यांच्या नात्यानं मगील काही दिवसांमध्ये अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यात सातत्यानं त्यांचं एकत्र दिसणं या सर्व चर्चांना आणखी वाव देत आहे. रविवारीच त्यांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. इथं ही जोडी एकत्रच दिसली. मालदीवला जातेवेळीसुद्धा त्यांना एकत्रच पाहिलं गेलं होतं.





इशान आणि अनन्यानं मालदीमध्ये एकत्रच सुट्टी व्यतीत केल्याचं म्हटलं जात आहे. त्या दोघांनीही सोशल मीडियावर काही फोटोही पोस्ट केले, पण दोघांचा एकत्र असा एकही फोटो त्यांनी पोस्ट केला नाही. पण, इशाननं पोस्ट केलेल्या एका फोटोनं नकळतच हे सिद्ध केलं आणि त्यांचं एकत्र परतणंही यावरच शिक्कामोर्बतच करुन गेलं.
इशान आणि अनन्याचे फोटो, व्हिडीओ पाहता चाहत्यांमध्ये आता त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. तेव्हा आता येत्या काळात ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या नात्याला नेमकं कोणतं वळण देते आणि या नात्याबाबत कोणतं अधिकृत वक्तव्य करते का, किंबहुना त्यांच्यात खरंच असं काही आहे का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.