मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेता कपिल शर्मा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. ‘फॅमिली टाईम विद कपिल’ या नव्या शोमधून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे.
सध्या सुरु असलेल्या ‘सुपर डान्सर सीजन 2’ या शोच्या जागी कपिलचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या डान्स शोच्या अंतिम फेरीनंतरच कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रात्री 9 वाजता कपिलचा कार्यक्रम असेल.
प्रेक्षकांसाठी काहीशी निराशा करणारी बातमी म्हणजे, या कार्यक्रमात कपिल शर्मा कॉमेडी करताना दिसणार नाहीय. मात्र त्याचे पूर्वीचे साथीदार म्हणजे कीकू शारदा, चंदन प्रभाकर यात असतील, तर सुनील ग्रोव्हर मात्र यात नसेल.
‘फॅमिली टाईम विद कपिल’चे प्रोमो सोनी टीव्हीने याआधीच दाखवण्यास सुरुवात केली होती. कपिल शर्माच्या स्ट्रगलवर आधारित हे प्रोमो तयार करण्यात आले असून, दिवस बदलण्यास वेळ लागत नाही, असे कपिल यातून सांगतो.
मध्यंतरी सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यानंतर कपिल शर्मा चर्चेत होता. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ही सोनी टीव्हीने बंद केला होता. त्यामुळे काही काळ कपिल शर्मा छोट्या पडद्यापासून दूर होता.
कपिल शर्मा छोट्या पडद्यावर परतणार, तारीखही ठरली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2018 07:47 PM (IST)
मध्यंतरी सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यानंतर कपिल शर्मा चर्चेत होता. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ही सोनी टीव्हीने बंद केला होता. त्यामुळे काही काळ कपिल शर्मा छोट्या पडद्यापासून दूर होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -