Kanye West : अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) सध्या चर्चेत आहे. कान्ये गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चर्चेत होता. पण आता तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कान्येने अॅडॉल्फ हिटलरचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.
एएफफी मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार,"कान्येनं एका मुलाखतीत त्याच्या मानसिक आजाराच्या संघर्षाबद्दल भाष्य करत होता. दरम्यान त्याने नाझी आणि अॅडॉल्फ हिटलरचं कौतुक केलं आहे. त्याच्या वादग्रस्त विधानामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुलाखतीत त्याने काळ्या मास्कचा वापर करत स्वत:चा चेहरा लपवला होता."
कान्येने मुलाखतीदरम्यान मानसिक आजाराबद्दलच्या संघर्षाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. अॅलेक्स जोन्सशी बोलताना कान्ये म्हणाला,"हिटलर एक चांगला व्यक्ती होता. माझ्या मनातील हिटलरची इमेज सकारात्मक आहे. त्याच्यात मला अनेक चांगल्या गोष्टी दिसतात. यानिमित्ताने मला बायबलबद्दल सेटनची आठवण होते. कारण तो एका बाजूला अध्यात्मित असला तरी दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या मार्गाने सामान्य व्यक्तींना देवाकडे जाण्यापासून रोखतो आणि असुरी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो".
कान्ये पुढे म्हणाला,"हिटलरने जगाला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्याने अनेक महामार्गांचा शोध लावला आहे. आता एक संगीतकार म्हणून मी वापरत असलेल्या मायक्रोफोनचा शोधही हिटलरनेच लावला आहे. त्याने अनेक मौल्यवान गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यामळे त्याच्याविषयी वाईट बोलणं बंद केलं पाहिजे".
कान्ये वेस्ट वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील सध्या चर्चेत आहे. कान्ये किम कार्देशीयनसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. आता वादग्रस्त विधानामुळे कान्ये पुन्हा चर्चेत आला आहे.
संबंधित बातम्या