Jubin Nautiyal Health Update : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) सध्या चर्चेत आहे. जिन्यांवरुन खाली पडल्याने जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जुबिनने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. 

Continues below advertisement


जुबिनने रुग्णालयातील एक फोटो शेअर करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 
फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार. देव माझ्यावर लक्ष ठेवून होता. या गंभीर अपघातातून त्याने मला वाचवले. आता मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुमचं प्रेम आणि प्रार्थनेबद्दल मनापासून आभार". 






जुबिनच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील त्याला काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देत आहेत. निती मोहनने लिहिलं आहे,"लवकर बरा हो, तुझ्यावर खूप प्रेम आहे". रॅपर बादशाहने लिहिलं आहे,"भाऊ लवकर बरा हो". 


जुबिनचा अपघात कसा झाला? 


जिन्यावरुन खाली उतरत असताना पाय सटकल्याने जुबिनचा अपघात झाला. या अपघातात जुबिन गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा हात आणि डोक्याला दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच आता उजव्या हाताचा जास्त वापर न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 


जुबिन नौटियाल हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय गायक आहे. नुकतच त्याचं 'तू सामने आये' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जुबिनची 'लूट गये ते हमनवा मेरे', 'रात लंबिया', 'गुठ्ठी मोहब्बत में' अशी अनेक गाणी तरूणांमध्ये लोकप्रिय आहेत. तरुणांचा तो आवडता गायक आहे. 


संबंधित बातम्या


Jubin Nautiyal : लोकप्रिय गायक जुबिन नौटियालचा अपघात; रूग्णालयात उपचार सुरु