Kanishka Soni: स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीनं देखील स्वत:शी लग्न केलं. कनिष्का सोनी (Kanishka Soni) ही अभिनेत्री गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर लाऊन फोटो शेअर करत असते. एक पोस्ट शेअर करुन कनिष्कानं स्वत:शीच लग्न केल्याबाबत माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी कनिष्कानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कनिष्काला 'तू गरोदर आहेस का?' असा प्रश्न विचारला. त्यानंतर कनिष्का गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. 

Continues below advertisement

कनिष्का सोनी यांची पोस्ट

कनिष्का सोनी ही सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तेथील काही फोटो शेअर करुन कनिष्का सोनीनं तिच्या प्रेग्नन्सीबाबत पसरलेल्या अफवांबाबत सांगितलं. कनिष्कानं पोस्टमध्ये लिहिलं, 'सेल्फ मॅरेज प्रमाणे मी सेल्फ प्रेग्नेंट नाहीये. माझं पिझ्झा, बर्गर खाल्यानं वजन वाढलं आहे. '

Continues below advertisement

पोस्ट शेअर करुन कनिष्कानं दिली सेल्फ मॅरेजची माहिती

काही दिवसांपूर्वी कनिष्कानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कनिष्का ही मंगळसूत्र आणि सिंदूर फ्लॉन्ट करताना दिसत होती. या फोटोला कनिष्कानं कॅप्शन दिलं, 'मी स्वत:शी लग्न केलं आहे. मी माझी स्वप्न स्वत: पूर्ण केली आहे. मी फक्त स्वत:वर प्रेम करते. मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी एकटीच राहणार आहे. मी माझ्या गिटारसोबत आनंदी आहे.'

 कनिष्कानं मालिकांमध्ये केलं काम‘दीया और बाती हम’, ‘पवित्र रिश्ता’,‘कुल्फी कुमार बाजेवाला’आणि ‘देवी’यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये कनिष्कानं काम केलं आहे. आता लवकरच कनिष्का हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती कॅनडाच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kanishka Soni: अभिनेत्री कनिष्क सोनीनं स्वत:शीच केलं लग्न; म्हणाली, 'मला पुरुषांची गरज नाही'