2014 मध्ये 'क्वीन' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर कंगनाने 10 कोटी रुपयांना मनालीत जमीन खरेदी केल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आहेत. चार वर्षांच्या परिश्रमानंतर हा बंगला बांधून तयार झाला आहे. बंगल्यावर झालेला खर्च धरुन ही किंमत 30 कोटींवर पोहचली आहे.
कंगनाचा बंगला अत्यंत देखणा असल्याचं काही जण सांगतात. या बंगल्यामध्ये तब्बल आठ बेडरुम्स आहेत. घरातील कुठलीही खिडकी उघडली, तरी समोर डोंगरांचं रम्य दृश्य पाहायला मिळतं. प्रत्येक खोलीला स्टेप-आऊट बाल्कनी आहे.
इतकंच नाही, तर वरच्या मजल्यावर रुफटॉप ऑब्झर्व्हेटरी आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश खेळता राहावा, याची पुरेपूर काळजी आर्किटेक्ट्सनी घेतली आहे. लिव्हिंग रुममध्ये फायरप्लेसची सोय करण्यात आली आहे.
बंगल्याच्या डायनिंग रुमची एक भिंत काचेची बांधण्यात आली आहे. त्यामुळे जेवतानाही डोंगरांचा व्ह्यू पाहता येईल. त्याचप्रमाणे जिम आणि योग रुमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
चार वर्ष बंगल्याच्या कामाचे अपडेट्स घेण्यासाठी कंगनाने वेळोवेळी मनालीला भेट देत होती. शबनम गुप्ता यांनी बंगल्याचं डिझाईन केलं आहे.