मुबंई : अभिनेत्री कंगना रनौतची एकीकडे सुपरस्टार ऋतिक रोशनसोबत न्यायालयीन लढाई सुरु आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडची ही ‘क्वीन’ धमाल करताना दिसतेय. कंगनाने आपलं लोकप्रिय गाणं ‘लंडन ठुमकदा’वर टीम इंडियाच्या दोन दिग्गज खेळाडूंना ठेका धरायला लावलं.
राजकुमार हिरानीच्या एका जाहिरातीसाठी टीम इंडियाचे धडाकेबाज खेळाडू विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना कंगनाने ठेका धरायला लावला. ही जाहिरात आयपीएलच्या जाहिरातींदरम्यान दाखवली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजकुमार हिरानींच्या या जाहिरातीसाठी कंगनाला तारखा मिळण्यास प्रचंड अडचणी आल्या. कारण कंगना सध्या विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन असलेल्या ‘रंगून’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राजकुमार हिरानींनी स्वत: विशाल भारद्वाजना विनंती करुन कंगनाला एका दिवसाची सुट्टी देण्यास सांगितलं.
राजकुमार हिरानींनी एकाच दिवशी जाहिरातीची शूटिंग पूर्ण करण्याचं ठरवलं आणि तसं केलंही. या जाहिरातीत कंगना ‘क्वीन’मधील भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंगनाची सेटवर विराट आणि धोनी यांच्याशी पाहतच क्षणी तयार झाली. तिघेही एकाच फ्रेममध्ये धमाल करताना दिसून आले.